The Maratha News
आज अंतरवाली सराटी मध्ये शंभूराज देसाई, आमदार राजेंद्र राऊत, संदिपान भुमरे, माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले होते. उपोषण सोडण्यासाठी त्यांनी त्यांची समजूत घातली. यावर मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या त्यांनी लिहून घेतल्या. तसेच उद्या ताबडतोब बैठक लावण्याचे आश्वासन दिले .त्यानंतर जरांगे पाटलांकडून सरकारला एक महिन्याचा वेळ देण्यात आला मात्र मागण्या मान्य न झाल्यास राजकारणात उतरणार असल्याचे सांगितले आणि सगळे उमेदवार पाडू असा गंभीर इशारा दिला. आणि मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण स्थगित केले.
सरकारला एक महिन्याचा वेळ मागण्या मान्य करण्यासाठी दिलेल्या असून 13 जुलै ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देऊन 13 जुलै चा अल्टीमेटम दिलेला आहे.
दरम्यान, महिनाभरात मागण्या मान्य झालं नसल्यास राजकारणात उतरणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मोठ्या प्रमाणावर मराठा मतांचा फटका बसला होता. त्यामुळे सरकार हवालदिल झाले होते. त्यातच 04 जून रोजी ज्या दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे त्याच दिवशी जरांगे पाटील हे उपोषण करणार होते परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आठ जून पासून त्यांनी उपोषण सुरू केले होते. त्यांच्या उपोषणाचे लोण राज्यभर पसरत चालले होते.
आज गुरुवारी दुपारी शंभूराज देसाई यांनी स्वतःच्या डायरीमध्ये जरांगे पाटील यांनी सांगितलेल्या मागण्या लिहून घेतल्या त्याच सोबत उद्याच अधिकाऱ्यांची मीटिंग लावतो असे सांगितले. मी मुख्यमंत्र्यांचा कार्यकर्ता असून शब्दाला फिरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची आण घेऊन तुमच्या मागण्यासाठी मी सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत संदिपान भुमरे, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, राणा जगजितसिंह पाटील आदी सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मराठा आरक्षणासाठी खासदार, आमदार हे पाटलांच्या भेटीला जात होते. तसेच काहींनी आपला जाहीर पाठिंबा दिला होता. तर काहीजणांनी राज्यपालांना आपले निवेदन सादर केले होते. आज सकाळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी या ठिकाणी गेले होते.