The Maratha News
निधन वार्ता
बाळे भागातील राजेश्वरी नगर येथील
अविनाश शामराव कुंभार, वय 29 वर्षे, यांचे शुक्रवारी पहाटे दोन वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ, पत्नी व लहान मुलाचा समावेश आहे.
त्यांच्या आकस्मिक जाण्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. अविनाश हे आध्यात्मिक व शांत स्वभावाचे होते. आज दुपारी बाळे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.