The Maratha News
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज गुरुवारी दुपारी सरकारचे प्रतिनिधी मंत्री शंभूराज देसाई, आमदार राजेंद्र राऊत, संदिपान भुमरे,राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते एक महिन्याचा कालावधी देऊन उपोषण सोडले. त्यावेळी त्यांनी काही मागण्या सांगितल्या होत्या .त्या देसाई यांनी आपल्या डायरीमध्ये नोंद करून ठेवल्या. यावेळी जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कॉल आल्याचे समाज बांधवांना सांगितले. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या फोनवरून फडणवीस जरांगे पाटलांशी बोलले.
काय झाली चर्चा..
जेव्हा एसआयटी चौकशी रद्द करण्यासाठी मराठा कार्यकर्त्यांनी जरांगे पाटील यांना शंभूराज देसाईंना या मागणीचा समावेश करा असे सांगितले. तेव्हा शंभूराज देसाई यांनी गृहमंत्री फडणवीस यांचे पाटलांशी या विषयावर चर्चा झाल्याचे सांगितले. उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. तेव्हा
जरांगे पाटील यांनी माईक हातात धरून सर्व समाज बांधवांसमोर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्याशी माझे बोलणे करून दिले. त्यातून एसआयटी चौकशी मेली असल्याचे सांगितले. म्हणजेच जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी रद्द केल्याचे समोर आले आहे. याबाबत आमदार राऊत यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बार्शी मध्ये मराठा आंदोलनासाठी आमदार राऊत यांनी वेळोवेळी मदत केलेली होती. समाजाच्या प्रश्नासाठी ते आग्रही असायचे. त्यातूनच सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री संदिपान भुमरे, माजी मंत्री राणा जगजीतसिंह पाटील यांच्या शिष्टमंडळात फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार म्हणून राऊत यांची वर्णी लागली होती.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करावे यासाठी समजूत घालणाऱ्या टीम मध्ये राऊत यांचा पुढाकार होता. मराठा समाज जरांगे यांच्या एसआयटी चौकशीवर मोठ्या प्रमाणावर नाराज झालेला होता. हे ओळखून राऊत यांनी फडणवीस यांच्याशी फोनद्वारे बोलणे करून हा विषय संपवला. समाजाची नाराजी दूर करण्यामध्ये राऊत यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला अशी चर्चा मराठा समाज बांधवात सुरू आहे.