The Maratha News
काही अडचण असल्यास मंडळाशी संपर्क साधावे – मंडळ विश्वस्त अमोल शिंदेचे आवाहन
सोलापुरातील 3 ऑक्टोबर पासुन सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त सोलापूर शहरात आदिशक्तीदेवीचे प्राणप्रतिष्ठापना तसेच हिंदु धर्म रुढीपंरेपरेनुसार विजयादशमी या पवित्र दिनी शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या शमी वृक्षाला सीमोल्लंघनासाठी सार्वजनिक मंडळे व मानाच्या देवस्थानाच्या काठी पालखी लेझीम,झांज,ढोल पथकासह भव्य मिरवणूका निघत असतात
याकरिता पोलिस व सोमपा प्रशासन विविध येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सार्वजनिक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अमोल शिंदे यांच्या कार्यालयात श्री.तुळजाभवानी मातेचे व छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन आरती करण्यात आले.
मध्यवर्ती मंडळाचे विश्वस्त व रुपाभवानी मंदिराचे मानकरी मल्लिनाथ मसरे अध्यक्षस्थानी होते.
मान्यवरांचे स्वागत व सत्कार मंडळाचे उत्सव अध्यक्ष प्रशांत कांबळे यांनी केले.
सचिव दत्तात्रय मेनकुदळे यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी मंडळाचे विश्वस्त दास शेळके,बसवराज येरटे,विजय पुकाळे,मल्लिनाथ याळगी,यांच्यासह सिध्दु आण्णा गुब्याडकर,चक्रपाणी गज्जम,ब्रहमदेव गायकवाड,दिलीप पाटील,मल्लिनाथ सोलापुरे,निलेश शिंदे,आशिष उपाध्ये,किसन गर्जे,गिरीश शहाणे,शिवानंद येरटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते