Friday, December 5, 2025
themarathanews.com
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
themarathanews.com
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ८ जून रोजी यलो अलर्ट, तर ९ ते ११ जूनदरम्यान ऑरेंज अलर्ट     

The Maratha News by The Maratha News
June 8, 2024
in महाराष्ट्र
0
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ८ जून रोजी यलो अलर्ट, तर ९ ते ११ जूनदरम्यान ऑरेंज अलर्ट     
0
SHARES
5
VIEWS

सिंधुदुर्गनगरी,: सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 ते 8 जून 2024 रोजी यलो अलर्ट तर दि. 9 ते 11 जून 2024  रोजी ऑरेंज अलर्ट असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे.

जिल्ह्यात दि. 7 व 8 जून 2024 या कालावधीत गडगडाट होऊन पाऊस पडण्याची व वीजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच दि. 7 जून रोजी 50 ते 60 किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  तसेच दि. 9 ते 11 जून या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

या कालावधीत वीजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी

विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा. विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी APP’ डाऊनलोड करून घ्यावे. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दुर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

नियंत्रण कक्ष व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे जिल्हा नियंत्रण कक्ष – 02362-228847 किंवा टोल फ्री 1077, 7498067835. पोलीस नियंत्रण कक्ष- 02362-228614 पोलीस टोल फ्री हेल्पलाईन-112, दोडामार्ग तालुका नियंत्रण कक्ष- 02363-256518, सावंतवाडी तालुका नियंत्रण कक्ष- 02363-272028, वेंगुला तालुका नियंत्रण कक्ष- 02366-262053, कुडाळ तालुका नियंत्रण कक्ष- 02362-222525, मालवण तालुका नियंत्रण कक्ष- 02365-252045, कणकवली तालुका नियंत्रण कक्ष- 02367-232025, देवगड तालुका नियंत्रण कक्ष- 02364-262204, वैभववाडी तालुका नियंत्रण कक्ष- 02367-237239 या प्रमाणे नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमाक आहे.

RelatedPosts

आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!

स्फूर्तीदायी : वसुंधरा संमेलनात झाला पर्यावरण संवर्धनाचा जागर…

हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in/mumbai/mcdata/district.pdf  या संकेतस्थळावरून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष ०२३६२-२२८८४७ किंवा टोल फ्री १०७७ किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क करा. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी.

Previous Post

पुन्हा उपोषणास्त्र : पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही जरांगे पाटील ठाम..

Next Post

पुन्हा घ्या नीट युजी 2024 ची परीक्षा ; या खासदाराने केली मागणी

Related Posts

आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!

September 27, 2024

स्फूर्तीदायी : वसुंधरा संमेलनात झाला पर्यावरण संवर्धनाचा जागर…

September 27, 2024

झोन बंद आंदोलनाचा
इशारा ; बाळे भागातील रस्ता मुरूम व खडीकरण कामास सुरुवात..

September 27, 2024

तुफान गर्दी: भारताचा दैदिप्यमान इतिहास प्रत्येकाला शिकवला तरच…! – अभिनेते शरद पोंक्षे

September 26, 2024
Next Post

पुन्हा घ्या नीट युजी 2024 ची परीक्षा ; या खासदाराने केली मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ कार्यालयाचे उद्घाटन
  • आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!
  • स्फूर्तीदायी : वसुंधरा संमेलनात झाला पर्यावरण संवर्धनाचा जागर…
  • झोन बंद आंदोलनाचा
    इशारा ; बाळे भागातील रस्ता मुरूम व खडीकरण कामास सुरुवात..
  • बाळे भागातील अविनाश कुंभार यांचे आकस्मिक निधन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2024
  • August 2024
  • July 2024
  • June 2024
  • May 2024

Categories

  • Blog
  • आरोग्य
  • क्रीडा
  • गुन्हेगारी
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Home
  • Latest news

© 2024 The Maratha News - Technical Support ByDK Techno's.

No Result
View All Result
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी

© 2024 The Maratha News - Technical Support ByDK Techno's.