Tuesday, December 9, 2025
themarathanews.com
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
themarathanews.com
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी

पुन्हा मैदानात! मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद रॅलीची जय्यत तयारी

The Maratha News by The Maratha News
June 29, 2024
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
0
SHARES
347
VIEWS

The Maratha News


हिंगोली (प्रतिनिधी)- मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे शनिवार दि.६ जुलै रोजी हिंगोली येथे शांतता संवाद रॅलीला येणार आहेत. रॅलीनिमित्त सकल मराठा समाजाची जिल्हास्तरीय बैठक शासकीय विश्रामगृहात काल शुक्रवार दि.२८ जुन रोजी संपन्न झाली. या बैठकीत पाचही तालुक्यासह उमरखेड, हदगाव व पुसद येथील मराठा स्वयंसेवक उपस्थित होते. संवाद रॅलीसाठी जबाबदारी म्हणुन तब्बल पंचवीस व्यवस्थापन समिती  कार्यरत करण्यात आले असुन यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले.



मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हिंगोलीतुन संवाद रॅलीला सुरुवात करणार आहेत. या निमित्ताने शुक्रवारी बैठक संपन्न झाली. बैठकीला जिल्हयातील मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते. विशेष म्हणजे हदगाव, पुसद व उमरखेड येथील मराठा बांधव बैठकीत सहभागी होते. संवाद रॅली नियोजनात समिती ऐवजी जबाबदारी व्यवस्थापन नियुक्त करण्यात आले.

यामध्ये जिल्हयातील मराठा स्वयंसेवक जबाबदारी घेऊन रेकॉर्ड ब्रेक  रॅली यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणार आहेत. रॅलीमध्ये सुुरुवात ते समारोप या विषयी चर्चा करुन नियोजन करण्यात आले. पार्कींग, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा, संपुर्ण शहरात साऊंड सिस्टिम, स्क्रीन व्यवस्था, निवेदक, बिछायत, जनरेटर व्यवस्था, महिला- पुरुष व्यवस्था, शिवनेरी चौक स्वागत, छत्रपती शिवरायांना अभिवादन, उखळी तोफांची सलामी, निवास व्यवस्था, स्वयंसेवक व्यवस्था, पाणी बॉटल व्यवस्था, बॅनर, कमान ध्वज व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था, तालुकास्तर दैनंदिन संवाद या सर्व जबाबदारी घेणार्‍या मराठा स्वयंसेवकावर नियंत्रण समिती याविषयी बैठकीत निर्णय घेण्यात आले.

RelatedPosts

सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!

जिल्हयात गावपातळीवर संवाद रॅलीची व्यापक जनजागृती करण्यात येत असुन तिला अनखीन वेग देण्यासाठी जनजागृती साहित्याचे वितरण करण्यात आले. पार्कींग व्यवस्था अतिशय चांगली राहण्यासाठी चर्चा करुन निर्णय घेण्यात आले. संवाद रॅलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वयंसेवक प्रशिक्षण दि.४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले आहे. यावेळी तज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात येणार असुन जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर प्रशिक्षणाच्या दुसर्‍या सत्रात स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. निवेदन करणार्‍यांना आचारसंहिता देण्यात येणार आहे.

सकल मराठा समाजा व्यतिरिक्त वैयक्तिक बॅनर लावण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. लाखो समाज बांधव येणार असल्यामुळे स्क्रीन टॉवर उभारणे व तीस वॉकी टॉकीच्या माध्यमातुन नियोजनबद्ध रॅलीत देखरेख राहणार आहे. वैद्यकीय सेवा, मराठा कुणबी जोडफे एकत्र करणे यासह अनेक विषयावर चर्चा करुन निर्णय घेण्यात आले. रॅलीत कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी कॅमेर्‍यांची नजर संपुर्ण रॅली परिसरात ठेवण्यात येणार आहे.

मुसळधार पाऊस असला तरी रॅली शिस्तबद्ध होण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. गावपातळीवर मुळपत्रिका वितरणाला रविवारपासुन सुरुवात झाली आहे. या बैठकीला हजारावर मराठा बांधव उपस्थित होते.
#मराठा #maratha

#Hingoli #MarathaReservation #मनोजजरांगेपाटील #hingolimaratha

Tags: hingolimaharashtraManoj Jarange PatilMaratha reservation
Previous Post

आधी NOC मग पेन्शन ; निवृत्तीवेतनाविना ‘मनपा’ सेवानिवृत्तांच्या कुटुंबियांची उपासमार..!

Next Post

भाजपच्या नेत्यांचे लक्ष्मीनगरसाठी महापालिकेला निवेदन ; ‘या’ आहेत मागण्या..!

Related Posts

सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

September 27, 2024

आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!

September 27, 2024

स्फूर्तीदायी : वसुंधरा संमेलनात झाला पर्यावरण संवर्धनाचा जागर…

September 27, 2024

झोन बंद आंदोलनाचा
इशारा ; बाळे भागातील रस्ता मुरूम व खडीकरण कामास सुरुवात..

September 27, 2024
Next Post

भाजपच्या नेत्यांचे लक्ष्मीनगरसाठी महापालिकेला निवेदन ; 'या' आहेत मागण्या..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • Gambling Act Uk
  • Free Slots With Bonus And Free Spins No Download
  • United Kingdom Online Casinos With No Deposit Bonuses
  • Popular Online Casino Games
  • Top 100 Slot Sites Uk

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • September 2024
  • August 2024
  • July 2024
  • June 2024
  • May 2024

Categories

  • Blog
  • आरोग्य
  • क्रीडा
  • गुन्हेगारी
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Home
  • Latest news

© 2024 The Maratha News - Technical Support ByDK Techno's.

No Result
View All Result
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी

© 2024 The Maratha News - Technical Support ByDK Techno's.