The Maratha News
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज रविवारी सोलापुरातील मोहोळ तालुक्यात जनसन्मान रॅलीच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी अर्धनग्न अवस्थेत असलेल्या काही मराठा समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून लागलीच पवार हे भर पावसात गाडीतून उतरले आणि त्यांनी मराठ्यांचे निवेदन स्वीकारले..!
मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आला असून मनोज जरांगे पाटील हे उपोषणासाठी बसलेले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर झाली असून त्यांचे उपोषण तात्काळ थांबवा, त्यासोबत सगेसोयरे अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करा अशी मागणी मोहोळ येथील मराठा आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली. अशी माहिती आंदोलक ॲड. श्रीरंग लाळे यांनी प्रसार माध्यमांना दिली.
अजितदादा काय म्हणाले..!
मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजी नंतर तात्काळ अजित पवार यांनी निवेदन स्वीकारले त्याच सोबत त्यांनी मराठा आंदोलकांनी संयम ठेवावा. आम्ही तोडगा काढण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. मी मुंबईला गेल्यानंतर तात्काळ उपोषण थांबवण्यासाठी मीटिंग लावून प्रयत्न करतो. असे आश्वासन उपस्थित समाज बांधवांना दिले.
यावेळी सोमनाथ पवार, बाळासाहेब गायकवाड, महेश पवार, शिवरत्न गायकवाड, मनोज मोरे, मोहन कादे, अजित भोसले, गणेश भोसले, बाबासाहेब पवार , धनू शिंदे, बंडू मुळे, सुनिता नागणे, रत्नाकर डोके व इतर मराठा बांधव उपस्थित होते.
यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र मोहोळ शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते.