The Maratha News
केंद्रीय कृषी मंत्रालयातील पथकाने बाजार समितीच्या कामकाजाबाबत या आहेत मार्गदर्शक सूचना…
राज्यात सोलापूर मार्केट यार्ड हे दुसऱ्या क्रमांकावर आहे.सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाच्या खरेदी-विक्रीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक बाजार समितीच्या कार्यालयात दाखल झाले होते. दिल्लीच्या केंद्रीय कृषी किसान कल्याण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सोलापूर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेल्या शेतमालाच्या बाजारभावासह , उत्पादनक्षमता आणि खरेदी – विक्रीसह बाजार समितीत कार्यरत असणाऱ्या विविध विभागांची त्यांच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून आढावा घेतला.
कोण कोण आहेत केंद्रीय पथकात..!
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या पथकात
केंद्रीय कृषी किसान कल्याण मंत्रालय विभागातील अव्वर सचिव जे.के. मनोज , कृषी विभागाचे उपसंचालक पंकज कुमार , सहायक संचालक मुकेश कुमार , पुण्याचे वरीष्ठ विपणन अधिकारी अच्युत सुरवसे , सोलापूर जिल्हा परिषदेचे विशेष घटक योजना कृषी अधिकारी नंदकुमार पाचकूडवे आदींचा समावेश होता. बाजार समितीच्या वतीने या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
असा घेतला आढावा..
कांद्यामध्ये बाजार समितीचा अव्वल नंबर..!
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी दाखल होत असतो. बाजारात आवक झालेल्या कांद्याला मिळणारा योग्य दर , आडत आणि खरेदीदार व्यापाऱ्यांचा फायदा, सद्यस्थितीतील पीकपद्धती, शेतमालाची उत्पादन क्षमता, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, कांद्याला मिळणारा उत्तम दर, उच्चप्रतीचा कांदा लागवडीसह साठवणूक यांसह इतर विषयावर मार्गदर्शक तत्वानुसार चर्चा करण्यात आली. यावेळी बाजार समिती मधील विविध विभागप्रमुखांनी आपल्या विभागाची सविस्तर माहिती केंद्रीय पथक अधिकाऱ्यांना दिली.
यावेळी माजी सचिव चंद्रशेखर बिराजदार, नामदेव शेजाळे, सचिन ख्याडे,महिबूब शेख,रजपूत यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
शेतकरी, अडते, व्यापारी यांच्या समस्या सोडण्यावर भर..!
केंद्रीय पथक समिती सदस्यांनी सोलापूर बाजार समिती मधील कृषी संदर्भात सद्यपरिस्थिती बद्दल आढावा घेतला. तसेच अडते आणि खरेदीदार व्यावसायिक यांच्याबद्दल सविस्तर चर्चा केली. योग्य ती प्रतिक्रिया शासन स्तरावरून कळविण्यात येणार आहे. भविष्यात कांदा उत्पादक शेतकरी, कांदा अडते आणि व्यापारी यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केंद्रीय स्तरावरून राहणार आहे.असे त्यांनी स्पष्ट केलं. खरीप पिके, निर्यात बंदी नंतर कांद्याची परिस्थिती, कांद्याच्या बाजारभावात झालेले बदल इत्यादी विषयांवर चर्चा झाली. संपूर्ण राज्यात केंद्रीय पथक माहिती घेत आहे. त्याच अनुषंगाने सोलापुरातील कृषी विभागासंदर्भात माहिती घेण्यासाठी बाजार समितीमध्ये आले होते.
– मोहन निंबाळकर, प्रशासक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर.