The Maratha News
संपूर्ण राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटले असून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत उपोषण करत आहेत. त्याचसोबत काही धनगर समाजाचे नेते आणि पदाधिकारी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. दोन समाजामध्ये कोणत्याही प्रकारची तेढ निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असून आज रविवारी सोलापुरातील अखंड मराठा समाजातील प्रमुख मंडळी पंढरपुरातील धनगर समाज आरक्षण करत असलेल्या ठिकाणी दाखल झाली.
नेमके काय घडले..!
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासोबत धनगर आरक्षणाला या आधीच संपूर्णपणे पाठिंबा जाहीर केलेला आहे. धनगर आरक्षण हे मराठा समाजाच्या मागणीच्या आड येत नाही. मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण हे दोन्ही वेगवेगळे प्रवर्ग आहेत. असे सांगितले होते. सोलापुरातील अखंड मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी पंढरपुरातील धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.