The Maratha News
अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शहर परिसरातील ज्ञानेश्वर माऊली युवा प्रतिष्ठानने शिवचरित्र सोबत संगणकाची पुस्तके देऊन शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते हंचाटे प्रचारातील विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्र व संगणकाची पुस्तके प्रशालाचे मुख्याध्यापक भालचंद्र हंचाटे यांना देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांचा इतिहास व संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी हा छोटासा उपक्रम राबवल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय पारवे यांनी दिली.

यावेळी माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, डॉ.अभिजीत वाघचवरे, डॉ.सर्जेराव दोलतोंडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी उत्सव अध्यक्ष दत्ता परसे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास युवा उद्योजक महेश ठाकरे,राहुल साळुंखे, टोणपे धोंडप्पा तोरणगी रामदास मगर संजय सुरवसे नागेश घोरपडे गजानन पवार, अनिल नंदी,शंकर पवार, बबलू घाडगे, अक्षय वाघे, भारत कुरणे,यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.