The Maratha News
मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर पोहोचवला असून त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे त्यास राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. धनगर समाज सुद्धा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन करून शासन दरबारी आपली मागणी मांडत आहे. मराठा आरक्षणाची मागणी ही वेगळ्या प्रवर्गातून असून धनगर आरक्षणावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही, याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार मांडली आहे.
याच पार्श्वभूमीवर अखंड मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी आज रविवारी दुपारी पंढरपुरात धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांची भूमिका समजावून घेऊन त्यांना मराठा समाजाच्या वतीने सक्रिय पाठिंबा जाहीर केला.
यावेळी अखंड मराठा समाज शहर जिल्हा सोलापूर
रवी मोहिते, राजन जाधव, दीपक वाडदेकर, ॲड.आडेकर, नागेश भोसले, मोहन चोपडे, प्रशांत जगताप,सुनील लावंड, शंकर उबाळे, अर्जुन कदम, औदुंबर गायकवाड, आदीसह बार्शी, कुर्डूवाडी, माढा, मोहोळ, पंढरपूर मधील मराठा समाज बांधव उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील, कोट्यावधी मराठा समाज तुमच्या पाठीशी…
धनगर समाजाच्या न्यायिक मागणीसाठी संविधानिक पद्धतीने उपोषण करणाऱ्या समाज बांधवांच्या पाठीशी मनोज जरांगे पाटील आणि कोट्यावधी मराठा समाज आहे. मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण हे दोन्ही प्रवर्ग वेगळे आहेत. राजकारणी दोन्ही समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु तो प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.
रवी मोहिते, मराठा सेवक
अखंड मराठा समाज
सरकारच्या मुंडीवर बसून आरक्षण घेऊ..!
ज्याप्रमाणे जरांगे पाटील आणि मराठा समाज सरकारच्या मुंडीवर बसून आरक्षणाची मागणी करत आहे त्याचप्रमाणे धनगर समाजाने मुंडीवर बसूनच आरक्षण घ्यावे. आम्ही मोठा भाऊ म्हणून आपल्या पाठीशी कायम आहोत.
पक्ष नेते यांच्यापेक्षा समाज कधीही मोठा असतो. सर्वसामान्य गरजवंत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा जाहीर करत आहोत.
राजन जाधव, मराठा सेवक
अखंड मराठा समाज, सोलापूर