The Maratha News
मराठा आरक्षण तसेच सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी मनोज जरांगे पाटील त्यांनी राज्यभर शांतता रॅलीच्या माध्यमातून वादळ निर्माण करण्याचे काम केले आहे. सोलापूर शहरात 7 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे येणार असून त्या निमित्ताने सकल मराठा समाजाच्या वतीने तालुका निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
याच पार्श्वभूमीवर आज रविवारी बार्शी ,करमाळा,माढा तालुक्यातील समाज बांधवांच्या बैठकांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
7 ऑगस्ट मनोज दादा यांच्या शांतता रॅली नियोजन करण्यासाठी शहरात संपर्क कार्याची निर्मिती करण्यात आली असून विविध कमिट्यांच्या माध्यमातून जय्यत तयारी करण्यात येत आहे.
दररोज सायंकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संकुल येथे राजर्षी शाहू महाराज सभागृह येथे बैठका आणि नियोजन करण्यात येणार आहे.
आज दिनांक 28 जुलै रविवारी सकाळी 11.30 वाजता बार्शी ,दुपारी 2.30 करमाळा, सायंकाळीं 6.30 वाजता माढा येथे समाज बांधवांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आलेले असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.