The Maratha News
शेळगीसाठी स्वतंत्र ३३ केव्ही उपकेंद्रास शासनाची तत्वतः मान्यता
परिसरातील नागरिकांची गैरसोय होणार दूर : माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी घेतली अधिकाऱ्यांसोबत बैठक
सोलापूर : प्रतिनिधी
शेळगीसाठी स्वतंत्र ३३ केव्ही उपकेंद्रास महावितरणची तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. याबाबत शुक्रवारी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयात महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतंत्र शेळगी ३३ केव्ही उपकेंद्राची मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली होती. त्यास मान्यता मिळाल्याची माहिती महावितरण अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.
शेळगी आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी वीजपुरवठा करण्याकरिता स्वतंत्र उपकेंद्र नसल्यामुळे येथे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, पुरेसा वीज पुरवठा न होणे अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेळगी येथे स्वतंत्र ३३ केव्ही उपकेंद्र सुरु करावे अशी मागणी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यास मंजूरी मिळाल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांसमवेत झालेल्या बैठकित दिली. तसेच या नागरी वस्तीत अनेकांच्या घरावर उघड्या विद्युत तारा आहेत. त्याही स्थलांतरित करून सुरक्षित कराव्यात, आदी सूचनाही करण्यात आल्या. माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शेळगी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष डॉ. किरण देशमुख, कृ. उ. बा. स संचालक बसवराज इटकळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ग्रामीण) सारिका साळुंखे, कार्यकारी अभियंता (शहर) आशिष मेहता, उप कार्यकारी अभियंता (ग्रामीण) सिकंदर मुल्ला, सहाय्यक अभियंता बाळे उपकेंद्र संतोष शितोळे, माजी नगरसेवक अविनाश पाटील, भाजपा शहर सरचिटणीस प्रा. नारायण बनसोडे, ज्ञानेश्वर कारभारी, सोमनाथ रगबले, सुरेश हत्ती, राजशेखर रोडगीकर, नागनाथ जावळे, मल्लिनाथ रमनशेट्टी, विश्वनाथ होसाळे, विकी पाटील, चंद्रकांत भक्ते, अमोल बिराजदार, निर्मळ गुड्डू, सागर गव्हाणे, संतोष मकाशे, रेवणसिद्ध यलशेट्टी, रेवणसिद्ध धप्पाधुळे, अप्पासाहेब कोनाळी, माळप्पा होनळगी आदींसह हद्दवाढ शेळगी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.